歌词
तू चालता माझ्यासवे भासे जणू सारे नवे
मन बावरे नेती जिथे जग हे नवे आकारले
जुन्या क्षणांना रुजण्याचे वेड का?
कसे कळेना ही लागे ओढ का?
हरपून भान सारे, सजले उनाड वारे
विसरून आज सारे हरवू जरा
हरपून भान सारे, सजले उनाड वारे
विसरून आज सारे हरवू जरा
♪
मुक्या पाकळ्यांना, जुन्या सावल्यांना
हलके-हलके खोल ना जरा
डोळे अंतरीचे जीवाला हवेसे
हलके-हलके जोड ना जरा
हो, भास पांघरून थोडे, श्वास सावरून थोडे
स्वप्न तू नव्याने दे मला
मिठीत माझ्या दरवळतो तू नवा
जणू नभाच्या उराशी चांदवा
हरपून भान सारे, सजले उनाड वारे
विसरून आज सारे हरवू जरा
♪
तुझ्या सोबतीने दूर-दूर जावे
फुलते-झुलते प्रीत ही जरा
तुला भेटण्याचे नव्याने बहाणे
फुलते-झुलते रीत ही जरा
हो, आज वाटते हसावे, आज वाटते रुसावे
छंद हा सुखाचा वेगळा
मिठीत माझ्या दरवळतो तू नवा
जणू नभाच्या उराशी चांदवा
हरपून भान सारे, सजले उनाड वारे
विसरून आज सारे हरवू जरा