歌词
तु बोल होतील सारे वेडे उनाड वारे
आडून माझ्या तुला ते देतील जे इशारे
इशारे हे एकदा तु ऐकना
बहाणे तु ही जरासे सांगना
तु बोल होतील सारे वेडे उनाड वारे
आडून माझ्या तुला ते देतील जे इशारे
इशारे हे एकदा तु ऐकना
बहाणे तु ही जरासे सांगना
♪
झुला आज बांधीन मी विणूनिया वाटांना
वर साज देईन मी पांघरुनी लाटांना
एक झोका मी ही देतो तु ही एकदा देना तो
हात लावूया चल त्या नभा
इशारे हे या नभाचे ऐकना
बहाणे तु ही जरासे सांगना
♪
बोलना तु ओढेन मी शाल सांज रातीची
सोबतीस ओवेन ही गाज या पावसाची
ये मिठीत तु जराशी, थेंब माळले नभाशी
झेलू आसवे ही ये जरा
इशारे हे आसवांचे ऐकना
बहाणे तु ही जरासे सांगना
इशारे हे एकदा तु ऐकना
बहाणे तु ही जरासे सांगना