歌曲 / 歌词

Chafa Bolena

Listen on Apple Music

歌词

चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना
चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना
चाफा बोलेना
♪
गेले आंब्याच्या बनी, म्हंटली मैनांसवें गाणी
गेले आंब्याच्या बनी, म्हंटली मैनांसवें गाणी
आम्ही गळ्यांत गळे मिळवून रे
गेले केतकिच्या बनी
गेले केतकिच्या बनी, गंध दरवळला वनी
नागासवें गळाले देहभान रे
चल ये रे, ये रे गड्या
नाचु, उडू, घालु फुगड्या
चल ये रे, ये रे गड्या
नाचु, उडू, घालु फुगड्या
खेळु झिम्मा, झिम् पोरी, झिम् पोरी, झिम् पोरी, झिम्
चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना
चाफा बोलेना
♪
हे विश्वाचे आंगण, आम्हां दिले आहे आंदण रे
हे विश्वाचे आंगण, आम्हां दिले आहे आंदण
उणे करू आपण दोघेजण रे
उणे करू आपण दोघेजण रे
जन विषयाचे किडे
जन विषयाचे किडे, यांची धाव बाह्याकडे
आपण करू शुद्ध रसपान रे
चाफा फुली आला फुलून
तेजी दिशा गेल्या आटुन
चाफा फुली आला फुलून
तेजी दिशा गेल्या आटुन
कोण मी चाफा, कोठे दोघे जण रे?
चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना
चाफा बोलेना