歌词
कबीराचे विणतो शेले
कबीराचे विणतो शेले
कौसल्येचा राम, बाई कौसल्येचा राम
कबीराचे विणतो शेले
कौसल्येचा राम, बाई कौसल्येचा राम
भाबड्या या भक्तासाठी
भाबड्या या भक्तासाठी देव करी काम
कौसल्येचा राम, बाई कौसल्येचा राम
एक एकतारी हाती, भक्त गाई गीत
एक एकतारी हाती, भक्त गाई गीत
एक एक धागा जोडी, धागा जोडी
जानकीचा नाथ
जानकीचा नाथ
राजा घनश्याम
कौसल्येचा राम, बाई कौसल्येचा राम
दास रामनामी रंगे, राम होई दास
दास रामनामी रंगे, राम होई दास
एक एक धागा गुंते, धागा गुंते
रूप ये पटास
रूप ये पटास
राजा घनश्याम
कौसल्येचा राम, बाई कौसल्येचा राम
विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होई काम
विणुन सर्व झाला शेला
विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होई काम
ठायी ठायी शेल्यावरती, शेल्यावरती दिसे रामनाम
रामनाम
रामनाम
दिसे रामनाम
राजा घनश्याम
कौसल्येचा राम, बाई कौसल्येचा राम
हळू हळू उघडी डोळे, पाही जो कबीर
पाही जो कबीर
हळू हळू उघडी डोळे, पाही जो कबीर
पाही जो कबीर
विणोनिया शेला गेला सखा रघुवीर, सखा रघुवीर
कुठे म्हणे राम
कुठे म्हणे राम
कुठे म्हणे राम
कौसल्येचा राम, बाई कौसल्येचा राम
कबीराचे विणतो शेले
कौसल्येचा राम, बाई कौसल्येचा राम
कौसल्येचा राम, बाई कौसल्येचा राम
कौसल्येचा राम, बाई कौसल्येचा राम, बाई कौसल्येचा राम