歌词
गणराज रंगि नाचतो
गणराज रंगि नाचतो, नाचतो
पायी घागर्या करिती रुणझुण
पायी घागर्या करिती रुणझुण
नाद स्वर्गी पोचतो
गणराज रंगि नाचतो, नाचतो
♪
कटी पितांबर कसून भर्जरी
कटी पितांबर कसून भर्जरी
बाल गजानन नर्तनास करि
तुंदिल तनु तरि चपल साजिरी
तुंदिल तनु तरि चपल साजिरी
लावण्ये साजतो
गणराज रंगि नाचतो
गणराज रंगि नाचतो, नाचतो
♪
नारद तुंबरु करिती गायन
नारद तुंबरु करिती गायन
करी शारदा वीणावादन
ब्रम्हा धरितो तालहि रंगुन
ब्रम्हा धरितो तालहि रंगुन
मृदंग धिमी वाजतो
गणराज रंगि नाचतो
गणराज रंगि नाचतो, नाचतो
♪
देवसभा घनदाट बैसली
देवसभा घनदाट बैसली
नृत्यगायने मने हर्षली
गौरीसंगे स्वये सदाशिव
गौरीसंगे स्वये सदाशिव
शिशुकौतुक पाहतो
गणराज रंगि नाचतो
गणराज रंगि नाचतो, नाचतो