歌词
कैलासाच्या गिरीशिखरावर ध्यानमग्न राहिला
(कैलासाच्या गिरीशिखरावर ध्यानमग्न राहिला)
सोडा समाधी गौरीनंदना गणपती प्रतिपाला
(गणपती प्रतिपाला, गणपती प्रतिपाला)
गुलाल उधळीत रवी अंबरा
(गुलाल उधळीत रवी अंबरा)
गुलाल उधळीत रवी अंबरा
(गुलाल उधळीत रवी अंबरा)
तेजस्वी जाहला (तेजस्वी जाहला)
तेजस्वी जाहला (तेजस्वी जाहला)
ऋषीमुनी जण हे तुला पूजीती
(ऋषीमुनी जण हे तुला पूजीती)
प्रातःसमयाला (प्रातःसमयाला)
स्वर मंडळ छेडीत शारदा (स्वर मंडळ छेडीत शारदा)
स्वर मंडळ छेडीत शारदा भूप राग गायीला
(सोडा समाधी गौरीनंदना गणपती प्रतिपाला)
(गणपती प्रतिपाला, गणपती प्रतिपाला)
सहा शास्त्र, ६४ कलांचा (सहा शास्त्र, ६४ कलांचा)
सहा शास्त्र, ६४ कलांचा (सहा शास्त्र, ६४ कलांचा)
देव तू गणनायका (देव तू गणनायका)
देव तू गणनायका (देव तू गणनायका)
विघ्न विनाशक, मंगलदायक
(विघ्न विनाशक, मंगलदायक)
धन्य श्री वरदायका (धन्य श्री वरदायका)
आनंदाने तुला अर्पितो (आनंदाने तुला अर्पितो)
आनंदाने तुला अर्पितो प्रिय तुझ्या मोदका
आराध्यकुल दैवता गणेशा (आराध्यकुल दैवता गणेशा)
मायबाप तू सखा (मायबाप तू सखा)
भक्तांच्या हृदयात मोरया (भक्तांच्या हृदयात मोरया)
ज्ञानदीप लाविला
(सोडा समाधी गौरीनंदना गणपती प्रतिपाला)
(गणपती प्रतिपाला, गणपती प्रतिपाला)
योगेश्वर नटराज शिवसुता (योगेश्वर नटराज शिवसुता)
योगेश्वर नटराज शिवसुता (योगेश्वर नटराज शिवसुता)
प्रसन्न होई आता (प्रसन्न होई आता)
प्रसन्न होई आता (प्रसन्न होई आता)
स्वागत करते वसुंधरा ही (स्वागत करते वसुंधरा ही)
उधळी प्रेम अक्षता (उधळी प्रेम अक्षता)
देवाधिदेवा श्रेष्ठ तूच (देवाधिदेवा श्रेष्ठ तूच)
देवाधिदेवा श्रेष्ठ तूच महान बुद्धिमता
सुस्वागतम गजर नामाचा...
सुस्वागतम गजर नामाचा जयघोष चालला
(सोडा समाधी गौरीनंदना गणपती प्रतिपाला)
(गणपती प्रतिपाला, गणपती प्रतिपाला)
(गणपती प्रतिपाला, गणपती प्रतिपाला)