歌词
झुळ-झुळ वाहे पुण्यजळाचा निर्झर हो, निर्झर हो
श्री विघ्नेशर सदन शुभंकर ओझर हो, ओझर हो
झुळ-झुळ वाहे पुण्यजळाचा निर्झर हो
श्री विघ्नेशर सदन शुभंकर ओझर हो
♪
गणरायाला विघ्नासुर ये शरण जिथे
गणरायाला विघ्नासुर ये शरण जिथे
भक्त जणांना भय दाविल का मरण तिथे, मरण तिथे
हे, विघ्नेश्वर करूणा दयेचे पाझर हो, पाझर हो
श्री विघ्नेशर सदन शुभंकर ओझर हो
♪
कृष्णशिळेचा मुशक धावे दाराशी
कृष्णशिळेचा मुशक धावे दाराशी
तैसा पडते भक्तांच्या संकट राशी, संकट राशी
भव्य चिराचे मंदिर तो चिर सुंदर हो, सुंदर हो
श्री विघ्नेशर सदन शुभंकर ओझर हो
झुळ-झुळ वाहे पुण्यजळाचा निर्झर हो, निर्झर हो
श्री विघ्नेशर सदन शुभंकर ओझर हो, ओझर हो