歌曲 / 歌词

Tinhi Sanja Sakhe Milalya

Listen on Apple Music

歌词

तीनी सांजा सखे मिळाल्या
तीनी सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला
तीनी सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला
आजपासुनी जिवे अधिक तू माझ्या हृदयाला
तीनी सांजा सखे मिळाल्या
♪
कनकगोल हा मरीचिमाली
कनकगोल हा मरीचिमाली, जोडी जो सुयशा
चक्रवाल हे पवित्र, ये जी शांत गभीर निशा
त्रिलोकगामी मारुत, तैशा निर्मल दाहि दिशा
साक्षी ऐसे अमर करुनि हे तव कर करिं धरिला
तीनी सांजा सखे मिळाल्या
♪
नाद जसा वेणूंत हो, रस जसा सुंदर कवनांत
गंध जसा सुमनांत, रस जसा बघ या द्राक्षांत
पाणि जसे मोत्यांत, पाणि जसे मोत्यांत
मनोहर वर्ण सुवर्णांत, मनोहर वर्ण सुवर्णांत
हृदयीं मी साठवीं तुज तसा जीवित जो मजला
तीनी सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला
तीनी सांजा सखे मिळाल्या