歌词
उठा-उठा सकळ जन, वाचे स्मरा गजानन
गौरीहराचा नंदन गजदवन गणपती
उठा-उठा सकळ जन...
ध्यानी आणूनी सुखमूर्ती स्तवण करा तिची कीर्ती
तो देईल ज्ञान मूर्ती मोक्ष, सुख शोधाया
उठा-उठा सकळ जन...
जो निज भक्तांचा त्राता वंद्य सुरवरा समर्था
त्यासी ध्याना भव, भय, चिंता विघ्नवार्ता निवारी
उठा-उठा सकळ जन...
♪
तो हा सुखाचा सागर श्री गणराज मोरेश्वर
भावे विनवितो गिरीधर भक्त त्याचा होऊनी
उठा-उठा सकल जन, वाचे स्मरा गजानन
गौरीहराचा नंदन गजदवन गणपती
उठा-उठा सकळ जन...