歌词 अणुरेणियां थोकडा । तुका आकाशाएवढा ॥१॥ गिळुन सांडिलें कलेवर । भव भ्रमाचा आकार ॥२॥ सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ॥३॥ तुका ह्मणे आतां । उरलो उपकारापुरता ॥४॥