歌曲 / 歌词

Sukh Anupam Santache Charani

Listen on Apple Music

歌词

सुख अनुपाम संतांचे चरणी ।
प्रत्यक्ष अलंकाभुवनी नांदतसे ।। १ ।।
तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली ।
जेणे निगमावली प्रकट केली ।। २ ।।
संसारी आसक्त मायमोहें रत ।
ऐसें जे पतित तारावया ।। ३ ।।
चोखा म्हणे तेच ज्ञानदेवी ग्रंथ ।
वाचिता सनाथ जीव होती ।। ४ ।।