歌词
दत्तात्रेया सद्गुरूराया
दत्तात्रेया सद्गुरूराया
दे मज तुझिया भक्तीचा अधिकार
दे मज तुझिया भक्तीचा अधिकार
तुझी माया रे अपरंपार
तुझी माया रे अपरंपार
दत्तात्रेया सद्गुरूराया
♪
चित्त निरांजनी स्नेह ओतुनी
विवेक वाती त्यात लावूनी
चित्त निरांजनी स्नेह ओतुनी
विवेक वाती त्यात लावूनी
ज्योत समर्पित तुझ्या प्रकाशी
ज्योत समर्पित तुझ्या प्रकाशी
उजळीत अंधकार
तुझी माया रे अपरंपार
तुझी माया रे अपरंपार
दत्तात्रेया सद्गुरूराया
♪
अभंग श्रद्धा धूप लाविला
सुगंध त्याचा भरुनी उरला
अभंग श्रद्धा धूप लाविला
सुगंध त्याचा भरुनी उरला
सुगंध धुमील वलये लेवून
सुगंध धुमील वलये लेवून
सुखावला अंगार
तुझी माया रे अपरंपार
तुझी माया रे अपरंपार
दत्तात्रेया सद्गुरूराया
♪
सुमन अर्पिले, सुमनच माझे
एक आर्तता मनी विराजे
सुमन अर्पिले, सुमनच माझे
एक आर्तता मनी विराजे
अहंपणाचा जळता कापूर
अहंपणाचा जळता कापूर
उरलो निरहंकार
तुझी माया रे अपरंपार
तुझी माया रे अपरंपार
दत्तात्रेया सद्गुरूराया
♪
अन्य नसे मज हाती साधन
अर्पिन तुज जे पूजा बांधून
अन्य नसे मज हाती साधन
अर्पिन तुज जे पूजा बांधून
रंकालाही राव बनविसी
रंकालाही राव बनविसी
ऐसा किमयागार
तुझी माया रे अपरंपार
तुझी माया रे अपरंपार
दत्तात्रेया सद्गुरूराया
दत्तात्रेया सद्गुरूराया
दे मज तुझिया भक्तीचा अधिकार
दे मज तुझिया भक्तीचा अधिकार
तुझी माया रे अपरंपार
तुझी माया रे अपरंपार
तुझी माया रे अपरंपार