歌曲 / 歌词

Hasun Waat Rokhu Nako, Nighun Dur Jau Nako

Listen on Apple Music

歌词

हसून वाट रोकू नको सोडना, सोडना, सोडना
निघून दूर जाऊ नको थांबना, थांबना, थांबना
हसून वाट रोकू नको सोडना, सोडना, सोडना
Hmm, निघून दूर जाऊ नको थांबना, थांबना, थांबना
हसून वाट रोकू नको...
♪
अजून क्षिणला कुठे गं खेळ या पश्चिमेचा
अजून संपला ना बोल माझिया आर्जवाचा
अजून क्षिणला कुठे गं खेळ या पश्चिमेचा
अजून संपला ना बोल माझिया आर्जवाचा
ओ, जवळ येऊनी, जवळ घेऊनी
तू माझे सांगणे ऐकना
निघून दूर जाऊ नको थांबना, थांबना, थांबना
हसून वाट रोकू नको...
♪
नभात भिनला सुरंगी जादूगरीचा इशारा
तमात बुडला पहाना असता जलाचा किनारा
नभात भिनला सुरंगी जादूगरीचा इशारा
तमात बुडला पहाना असता जलाचा किनारा
रानात सावल्यांच्या मनात सावल्यांचे
भय वाटते यौवना
हसून वाट रोकू नको...
निघून दूर जाऊ नको...
हा, हसून वाट रोकू नको...
♪
इथेच काळ थांबवा गं विरहाची ती नको रात
उगीच नको रे दुरावा भेटेन तुला मी स्वप्नात
इथेच काळ थांबवा गं विरहाची ती नको रात
उगीच नको रे दुरावा भेटेन तुला मी स्वप्नात
स्वप्नील सुखाच्या झुल्यावर भेटू रे, साजणा
स्वप्नील सुखाच्या झुल्यावर भेटू रे, साजणा
भेटू गं, साजणी
हसून वाट रोकू नको सोडना, सोडना, सोडना
निघून दूर जाऊ नको थांबना, थांबना, थांबना
हसून वाट रोकू नको...
निघून दूर जाऊ नको...
हा, हसून वाट रोकू नको...
हसून वाट रोकू नको...