歌曲 / 歌词

Allad Hullad Mana

Listen on Apple Music

歌词

अल्लड-हुल्लड मनां, सावर जरा ऐकणा
अल्लड-हुल्लड मनां, सावर जरा ऐकणा
कधी मिठीची आसं, चाहूल तुझी खास
मनी तुझाच भास का?
येडं येडुल मनं, तुझ्याविना ही सुनं
आतुर खुळं मनं का?
अल्लड-हुल्लड मनां...
♪
तुझ्या सोबतीचा आसरा
तुझ्या संगतीचा निवारा
पाकुळला जीव बावरा
तुझ्याविना अधुरावून
भरल्या शिवारी, यातना जिव्हारी
आगळी खुमारी बंधना
मरतो झुरुनी, उरतो मरुनी
लागल्या अंतरील खुणा
काहूर दाटे मनी, कशी ही आणीबाणी?
अधीर उरी भावना
तुझ्यात अर्थ सारा, तुझ्या ठायी किनारा
तुझाच स्वर्ग या मनां
अल्लड-हुल्लड मनां...
♪
खुळ्यावानी भिर-भिरला
मोहरल कधी झरला?
तुझ्या आठवाचा चांदणं
पांघरून मन भरलं
सावरू कसा मी? आवरू कसा मी?
भरला उरात चांदवा
झिंगल्या सुरात, दंगल्या उरात
रंगल्या भरात भावना
तुझ्या कुशीत घेणं, तुझाच सोबतीन
झुलू दे अंबरी झुला
वाहिनं सारं तुला, राहीनं सोबतीला
सुखाची सर स्पंदना
अल्लड-हुल्लड मनां, सावर जरा ऐकणा