歌词
चल साधका...
चल साधका, चल यात्रिका
चल श्री गजानन पूजका
चल पाहू त्या वरदायका
चल पाहू त्या वरदायका
चल पाहू सिद्धीविनायका
चल साधका...
♪
हे, सिद्धटेक प्रसिद्ध रे
येथेचं कैथव भंजिला
श्री विष्णूने जय लाभण्या
येथे गजानन पूजिला
हरिनेच आणून गंडकी
हरिनेच आणून गंडकी
साकारिले गणनायका
चल साधका...
♪
ऐकाल लोककथा इथे
श्री व्यास होते राहिले
श्री मोरया गोसावी हे
येथे तपास्तव बैसले
ही पुण्यपावन रे धरा
ही पुण्यपावन रे धरा
ही पुण्यपावन मृत्तिका
चल साधका...
चल साधका...