歌曲 / 歌词

Lallati Bhandar

Listen on Apple Music

歌词

नदीच्या पल्याड आईचा डोंगुर
नदीच्या पल्याड आईचा डोंगुर
डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर
डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर
घालु जागर जागर डोंगर माथ्याला
घालु जागर जागर डोंगर माथ्याला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार हेऽ
लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार, आहाऽ
नदीच्या पान्यावर आगीनं फुलतं
नदीच्या पान्यावर आगीनं फुलतं
तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं
तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं
नाद आला गं आला गं जीवाच्या घुंगराला
नाद आला गं आला गं जीवाच्या घुंगराला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार हेऽ
लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार, आहाऽ
नवसाला पाव तू, देवी माझ्या हाकंला धाव तू
हाकंला धाव तू, देवी माझ्या अंतरी ऱ्हावं तू
देवी माझ्या अंतरी ऱ्हावं तू, काम क्रोध परतुनि लाव तू
काम क्रोध परतुनि लाव तू, देवी माझी पार कर नाव तू
डोळा भरून तुझी मुरत पाहीन
मुरत पाहीन, तुझा महिमा गाईन
महिमा गाईन, तुला घुगऱ्या वाहीन
घुगऱ्या वाहीन, तुझा भंडारा खाईन
दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला
दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार हेऽ
लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार, आहाऽ
यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती ही जमल्या गं लेकरं
हेऽ पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर जागर ह्यो, भक्तीचा सागर
आहाऽ
खणानारळानं वटी मी भरीन
वटी मी भरीन, तुझी सेवा करीन
सेवा करीन, तुझा देवारा धरीन
देवारा धरीन, माझी वंजळ वरीन
आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला
आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी हेऽ
लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार, आहाऽ
यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती ही जमल्या गं लेकरं
हेऽ पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर, जागर ह्यो, भक्तीचा सागर